स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

गोकुळ-धावडे, ता. पाटण : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांच्या हस्ते स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकहितवादी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.पुण्यतिथी निमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शालेय परिसरात 100 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.वैभव घोणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विकास लोहार सर यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *