मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा ) यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना मसाले दूध देण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वतीने गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्य मा श्री प्रशांत पवार आप्पा यांनी वाढदिवसानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पूरक म्हणून केळी वाटप केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events










