गोकुळ-धावडे : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे, ता. पाटण येथे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कागद काम या सृजनशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता, कलात्मक कौशल्य आणि राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध रंगीत कागदांचा वापर करून तिरंगा, राष्ट्रभक्तीपर कलाकृती तसेच आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार केल्या.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. सर यांनी विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे महत्त्व व राष्ट्रध्वजाचा सन्मान याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. विकास लोहार सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कागदी कलाकृती तयार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.या उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव दिला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींमधून देशप्रेम आणि तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त झाला.विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला शालेय स्तरावर सर्जनशीलतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आहे.

Posted inNews and Events






