*गोकुळ-धावडे (ता. पाटण) : स्वच्छ व हरित विद्यालय स्पर्धा – 2026 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाने देशपातळीवर ६ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळीचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या शुभहस्ते विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन.एस. सर यांनी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा)यांचा विद्यालयाचे वतीने शाल श्रीफळ व आंब्याचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाचे वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन.एस. सर यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.यावेळी बोलताना अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांनी विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करताना, “स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य विद्यालयाने प्रभावीपणे केले आहे. हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद असून भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे,” असे गौरवोद्गार काढले.विद्यालयाने परिसर स्वच्छता, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या सर्व उपक्रमांच्या जोरावर विद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर मानाचे ६ वे स्थान मिळविले.सत्कार सोहळ्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचाशाल, श्रीफळ व आंब्यांचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही उत्कृष्ट कार्य करत विद्यालयाचे नाव अधिक उंचावण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.विलास कुराडे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.केंडे पी. एल.,श्री.शिवाजी शेंडे, श्री.किसन गालवे, श्री.बळीराम सुर्वे, श्री.संदीप कोळेकर,श्री.अमोल यादव, परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री घोणे व्ही. ए. यांनी मानले.या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे तसेच मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी यांच्या शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याचा गौरव देशपातळीवर झाला असून परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Posted inNews and Events









