महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा राज्यस्तरीय पुरस्कार श्री विकास लोहार यांना प्रदान.

महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा राज्यस्तरीय पुरस्कार श्री विकास लोहार यांना प्रदान.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजधानी सेवा प्रतिष्ठान कराड व अनुश्री फाउंडेशन कराड सातारा यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा राज्यस्तरीय पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश गोकुळ धावडे विद्यालयाचे उपक्रम शील व तंत्रस्नेही शिक्षक श्री विकास हणमंतराव लोहार यांनी शनिवार दि.१६ मे २०२६ रोजी सौ वेणूताई चव्हाण नाट्य सभागृह कराड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मा श्री चंद्रशेखर कुलकर्णी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा.श्री.ऍड. तुषार शिवचरण, मराठी सिनेअभिनेत्री राजश्री कोळी (प्रेमाची गोष्ट-२), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे उपलेखापाल मा सौ वैशाली कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक व समृद्धी पब्लिकेशनचे संचालक मा श्री डॉ. बी एन खरात , मा श्री दिलीपराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. विकास लोहार सर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा श्री रविराज देसाई दादा , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री यशराज देसाई दादा ,युवा नेते ॲड मा. चि. जयराज देसाई दादा,मा.चि. आदित्यराज देसाई दादा, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे उपाध्यक्ष सचिव,सर्व संचालक मंडळ,न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री एन एस कुंभार सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक,आजी-माजी विद्यार्थी यांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *