पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे या माध्यमिक विद्यालयाने स्वच्छ व हरित विद्यालय पुरस्कार-2026 मध्ये सहभाग घेऊन देशपातळीवर सहावा क्रमांक मिळवलेला आहे,.गतवर्षी झालेल्या मूल्यांकनामध्ये स्वच्छ व हरित विद्यालय पुरस्कार -2026 या पुरस्कारासाठी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या माध्यमिक विद्यालयाची माध्यमिक गटामध्ये निवड देश पातळीवर झाली झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा,युवा नेते मा.ॲड जयराज देसाई दादा, अभियंता मा.श्री.आदित्यराज देसाई दादा ,संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलास कुऱ्हाडे,सचिव श्री डी.एम.शेजवळ,सर्व संचालक मंडळ, गट शिक्षणाधिकारी सौ.दीपा बोरकर मॅडम, यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नथुराम कुंभार सर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Posted inNews and Events




