मा. श्री रविराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयास सदिच्छा भेट.

मा. श्री रविराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयास सदिच्छा भेट.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रविराज देसाई दादा यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक प्रगती व विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. शिक्षकांचे समर्पण आणि विद्यालयातील सर्वांगीण विकास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व मार्गदर्शनपर सूचना दिल्या.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *