मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.एस. सर यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन.एस. सर यांनी लोकनेत्यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केले .या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.विकास लोहार सर यांनी मानले.

Posted inNews and Events


