न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांचे चरण पूजन करून व पुष्प देवून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयास विद्येची आराध्य देवता गणपती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट दिल्या. या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस. सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी त्यांनी गुरू परंपरेविषयी माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली.या कार्यक्रमांच्या निमित्ताने कु. श्रेया सुतार कु. आश्लेषा शिंगमोडे कु. पूर्वी शिद्रुक, कु. तृप्ती कांबळे, कु. वैष्णवी अवघडे,कु. स्वरा कांबळे,कु. वेदिका कांबळे या विद्यार्थीनी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. संजना गालवे ने मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *