मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल , गोकुळ-धावडे ता. पाटण या विद्यालयाचा इयत्ता 10 वी मार्च -2026 च्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 100% लागला असून विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली आहे.विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक पुढीलप्रमाणे —कु. सुर्वे आकांक्षा दत्तात्रय — 83.80%कु. शिंदे अनुष्का उत्तम — 81.80%कु. यादव अंजली आनंदा — 80.00%सुतार दर्शन दशरथ — 77.80%कु. सुतार पल्लवी भागवत — 75.80%या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरी जाऊन विद्यालयाच्या वतीने पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Posted inNews and Events



