गोकुळ-धावडे : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री ना. मा. श्री. शंभूराज देसाई साहेब व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, त्याचे महत्त्व, नागरिकांना उपलब्ध असलेले अधिकार तसेच या कायद्याच्या माध्यमातून पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.माहिती जाणून घेणे, अधिकार समजून घेणे आणि जबाबदार नागरिक बनणे हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विकास लोहार सर यांनी केले, तर आभार श्री. शिंदे टी. व्ही. सर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events




