न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे  या विद्यालयात  योग दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात 21जून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान- धारणा सादर करत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून उलगडून दाखवले. यावेळी शारीरिक शिक्षण विषय शिक्षक श्री. घोणे व्ही. ए. यांनी  विद्यार्थ्यांना  योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.या  कार्यक्रमासाठी विद्यालयाचे   मुख्याध्यापक श्री.कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शिंदे टी. व्ही.यांनी केले,तर आभार श्री.लोहार व्ही. एच.यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *