महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे दिग्गज लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११६ वी जयंती मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभार एन.एस. सरांनी लोकनेत्याच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी लोकनेत्याच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events



