आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये साक्षरता दिंडी उत्साहात साजरी.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये साक्षरता दिंडी उत्साहात साजरी.

गोकुळ-धावडे : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे, ता. पाटण, जि. सातारा येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.श्री.ना शंभूराजे साहेब व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसानिमित्त साक्षरता दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.साक्षरतेचे महत्त्व जनमानसात रुजविणे, शिक्षणाबाबत जागृती निर्माण करणे तसेच ‘शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध साक्षरता संदेश, घोषवाक्ये व जनजागृतीपर फलक हातात घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसरात साक्षरतेचा संदेश घुमला.‘साक्षर होऊया, समाज घडवूया’, ‘शिक्षणाची ज्योत प्रत्येक घरात पेटवूया’ अशा संदेशांतून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले.साक्षरता दिंडीच्या माध्यमातून शिक्षण, ज्ञान आणि सामाजिक प्रगतीचा संदेश देत विद्यालयाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *