माजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब यांची113वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी.

माजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब यांची113वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयामध्ये माजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब यांची 113वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा नेते मा.श्री.आदित्यराज देसाई (दादा) यांच्या हस्ते प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.एस.सर यांनी केले.याप्रसंगी एस.एस.सी. मार्च 2026 परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम युवा नेते मा. श्री. आदित्यराज देसाई (दादा) यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी युवा नेते मा.श्री. आदित्यराज देसाई (दादा) यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय शंकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रम प्रसंगी शालेय परिसराची व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी काम व चित्रकला प्रदर्शनाची तसेच आकर्षक रांगोळीची पाहणी करून समाधान व्यक्त केले . यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक ,सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.शिंदे टी. व्ही.सर व आभार श्री. विकास लोहार सर यांनी व्यक्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *