न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

गोकुळ-धावडे (ता. पाटण) : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणाचा मान मान्यवर श्री. किसन बोत्रे यांच्या हस्ते पार पडला. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत तसेच समूहगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली.यावेळी इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यालयाने केलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला.तसेच श्री. घोणे सर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास आणि त्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी श्री. शिवाजी बोत्रे, श्री. सुनिल पवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिंदे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विकास लोहार सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *