पनामा O2 पाॅवर आणि न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पनामा O2 पाॅवर आणि न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पनामा O2 पाॅवरआणि न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पनामा O2 पाॅवर चे श्री.राजेंद्र कदम(माऊली) श्री.बोर्गे साहेब,श्री.प्रकाश देशमुख यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल.यांनी केले.यावेळी वरिष्ट शिक्षक श्री.शेजवळ सर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी पनामा O2 पाॅवर कंपनी कडुन विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्‍या गरजा पुर्ण व्हाव्यात असे आवाहन केले.पनामा O2 पाॅवर चे श्री.राजेंद्र कदम(माऊली) यांनी मुख्याध्यापकांनी केलेल्या आवाहनाचा कंपनी निश्चित विचार करेल असे आश्वासन दिले.या वेळी लो.बा.दे.फौ.चे सचिव श्री.कुंभार एन.एस. सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.आभार श्री.घोणे सर यांनी मानले.