न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डाॅ.सर सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पुजन विज्ञान विषयाचे उपक्रमशील शिक्षक व लो.बा.दे.फौ.चे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केंडे पी.एल. वरिष्ठ शिक्षक श्री. शेजवळ एस.डी.सर्व शिक्षक उपस्थित होते. या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डाॅ.सर सी.व्ही.रमण यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केली तसेच विज्ञानावर आधारीत आकर्षक अशा रांगोळ्या साकारल्या.तसेच कृषी पर्यटनावर आधारीत उपकरणे मांडण्यात आली होती. यावेळी  विज्ञान विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री.कुंभार सर यांनी मानवाच्या जीवनातील विज्ञानाचे  महत्व सांगितले .वरिष्ट शिक्षक श्री.शेजवळ सर यांनी विज्ञानाचे महत्व सांगत विज्ञान शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी विज्ञानातील गमती जमती आपल्या मनोगतात सांगितल्या.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक श्री.घोणे सर वआभार श्री.शिंदे सर यांनी मानले.