पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये एस.एस.सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई [दादा] हे होते,त्यावेळी ते म्हणाले की,हे विदयालय डोंगराळ,दुर्गम भागातील असून पाच-सहा कि.मी.पायी प्रवास करून विदयार्थी शिक्षण घेत आहेत,परंतू कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लास न लावता विदयालयातील शिक्षकांनी केलेल्या अध्यापन तसेच मार्गदर्शनावरच हे विदयार्थी चांगले गुण मिळवित आहेत,या विदयालयाचा इ.10 वी च्या वर्गाचा 100%निकाल हा सतत लागत असतो.,तशीच निकालाची परंपरा कायम ठेवा असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी शालेय तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा तसेच एन.एम.एम.एस.परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शेजवळ सर यांनी केले.या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे,लो.बा.दे.फौ.चे सचिव श्री.कुंभार एन.एस वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ एस.डी.,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. घोणे सर यांनी मानले.












