गुरुवार दि. 26/01/2023 या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.अॅडव्होकेट जयराज देसाई दादा उपस्थित होते ध्वजारोहणाचा कार्यक्रम धावडे गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक श्री. बळीराम सुर्वे यांच्या हस्ते मा. मुख्याध्यापक व लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव श्री. कुंभार सर श्री भानुदास कोळेकर ( शेठ ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच परिसरातील गोकुळ,धावडे, कोरडेवाडी, दिक्षी,गुरेघर, बाहे ,आटोली, पाचगणी ,आंब्रग, आंबेघर, वरंडेवाडी, वर्पेवाडी, पाळशी, पाणेरी, काहीर, कोकिसरे या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.








