ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले .यावेळी मा.आदित्यराज देसाई (दादा) उपस्थित होते.सौ.पवार मॅडम यांनी प्रास्तविक केले .स्वागतगीत इ.10 च्या विद्यार्थीनींनी सादर केले .शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल. सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.लेक वाचवा हो वाचवा हे गीत सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले.यावेळी अनेक मुलींनी मनोगते व कविता सादर केल्या.यावेळी मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ एस.डी.,श्री.कुंभार एन.एस. व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांनी मनोगते व्यक्त केले.या वेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होते.इ.9 वी तील सुमित गायकवाड या विद्यार्थ्याने पोवाड्याचे गायन केले.यावेळी अध्यक्ष महोदयांनी कवितागायन ,वेशभुषा करणार्‍या मुला-मुलींचे व पोवाडा गायन करणार्‍या विद्यार्थ्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे आभार श्री.घोणे व्ही.ए. यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.