मुलींनी स्व:संरक्षण करणे काळाची गरज-सहाय्यक पोलिस सौ.लोंढे मॅडम    

मुलींनी स्व:संरक्षण करणे काळाची गरज-सहाय्यक पोलिस सौ.लोंढे मॅडम    

    मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे व न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ- धावडे  या विदयालयामध्ये आज २४ नोव्हेंबर २०२२ रोजी “सातारा पॅटर्न” मा.ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणेबाबतचा असलेला मानस तो म्हणजे “निर्भया पथक”त्यांची आज कार्यशाळा  विदयालयामध्ये पाटण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विदयमानाने संपन्न झाली,या कार्यशाळेसाठी पाटण पोलिस ठाण्यांचे सहाय्यक फौजदार मा.श्री.कटरे  साहेब,मा.श्री.लादे साहेब,व मा.सौ.लोंढे मॅडम यांनी विदयार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक  सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,व विदयार्थी  उपस्थित होते,