न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात स्व.शिवाजीराव देसाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी केले. स्व.शिवाजीराव देसाई [आबासाहेब] यांच्याविषयी श्री.केंडे सर , श्री.शेजवळ सर,श्री.कुंभार सर यांनी मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वह्या देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.घोणे सर यांनी मानले.या प्रसंगी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events



