अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांची  न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयास  सदिच्छा भेट.

अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांची  न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयास  सदिच्छा भेट.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांनी दिनांक 10/12/2026 रोजी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान विद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांनी विद्यालयाचे वतीने स्वागत केले.आपल्या भेटीत मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांनी वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय,नव्याने सुरु होत असलेली संगणक प्रयोगशाळा तसेच चालू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली व विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.या वेळी कै. सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे आयोजित, 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाचे उपकरणास तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या कु. अक्षरा शांताराम विचारे व पूजा शिवाजी बोत्रे या विद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सदिच्छा भेटी प्रसंगी विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग व ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *