
मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा.श्री रविराज देसाई (दादा) यांनी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी शालेय परिसर, परसबाग,विद्यालयाच्या भौतिक सुविधा,तसेच विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता याविषयी आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन. एस.सर यांनी स्वागत केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












