शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.

शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.

*शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा* सोनवडे – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान- धारणा सादर करत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून उलगडून दाखवले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. “योग ही भारतीय संस्कृतीची मौल्यवान देणगी असून, तो जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षक श्री.जाधव ए.के सर यांनी केले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले , आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब मंत्री पर्यटन ,खणीकर्म, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा , मा.श्री.रविराज देसाई अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, संस्थेचे उपाध्यक्ष मा.विलास कुराडे,मा.श्री.यशराज देसाई चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, युवा नेते मा जयराज देसाई दादा, आदित्यराज देसाई,संस्थेचे सचिव मा.श्री. डी. एम.शेजवळ, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, यांनी योग दिनाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी.एल.केंडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शरद शेजवळ यांनी केले,तर आभार श्री.संतोष कदम यांनी मानले.

SIMPLY GALLERY NOT AVAILABLE