शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे – मा.श्री. पी.एल. केंडे सर 

विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे – मा.श्री. पी.एल. केंडे सर 

पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आज  इ.9 वी च्या विद्यार्थ्यांची  इ.10 वी च्या वर्गाच्या गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून  शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्याना या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे आहे, यासाठी आमच्या विद्यालयामध्ये इ.5 वी इ.8 वी स्कॉलरशिप परीक्षा, एन.एम.एम.एस. परीक्षा विविध नाविन्य पूर्ण उपक्रम, शिवाजीराव देसाई प्रबोधीनी स्पर्धा परीक्षा, मोरणा गुरुकुल पॅटर्न , शालेय विज्ञान प्रदर्शन , असे नावीन्यपूर्ण उपक्रम  विद्यालयात राबविले जातात,असे ते यावेळी म्हणाले.

या सह विचार सभेदरम्यान पालकांनी विद्यालयाच्या एकूणच गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले, यादरम्यान श्री.डोंगरे एस.एल.सर, कु.मणेर एस.एस.मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले,पालकांनी आपली मते मांडली,तसेच या सह विचार सभेचे प्रास्ताविक व आभार श्री.संतोष कदम सर यांनी मानले ,यावेळी  बहुसंख्येने पालक  सह विचार सभेसाठी उपस्थित होते.