
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री _श्री.पी.एल.केंडे अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की, आज बाजारपेठेत विविध आकाराचे रंगाचे आकाश कंदील विक्रीस आलेले आहेत,ते आपण विकत घेतो,परंतू स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो,आज इको फ्रेंडली आकाश कंदील बनविणे ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे,खरोखरच या कार्यशाळेतून विदयार्थ्यांच्या अंगी असणा-या कलागुणांना वाव मिळेल,असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यशाळेमध्ये कलाशिक्षक श्री.संभाजी कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विदयालयातील विदयार्थ्यांनी सुंदर व कल्पकतेने, वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंचा व क्राफ्ट पेपरचा वापर करून पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक विदयालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे याने मानले,यावेळी प्रदूषणमुक्त दिवाळी,फटाकेमुक्त दिवाळी ही सामूहीक शपथ घेण्यात आली,
या कार्यशाळेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.