
पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या माध्यमिक विदयालयामध्ये माझी माती -माझी देश या अभियानातर्गंत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामध्ये हा केंद्रस्तरीय नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला,हा उपक्रम शिवाजीराव देसाई विदयालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते त्यावेळी ते म्हणाले की, भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीसाहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर माझी माती-माझा देश हा स्तुत्य उपक्रम राबविलेला असून यांचे संपूर्ण भारतभर कौतूक होत आहे, असे मत यावेळी व्यक्त केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम सर यांनी केले ,तसेच श्री.एस.व्ही.भिसे,श्री.एस.डी.कुंभार,कु.एस.एस.मणेर ,यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाप्रसंगी विदयार्थ्यांनी भारत माता की जय ,जय जवान जय किसान, मेरी माटी मेरा देश, वंदे मातरम अशा घोषणा देत शालेय परिसर दुमदूमून सोडला, या कार्यक्रमाचे आभार श्री.संजय डोंगरे सर यांनी आभार मानले,या कार्यक्रमासाठी विदयालयातील सर्व शिक्षक वृंद व विदयार्थी उपस्थित होते.