पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की, लोकनेते साहेबाचा शब्दाखातर आबासाहेबांनी मुंबईसारख्या शहरामध्ये स्वत:चा व्यवसाय सोडून मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारणीसाठी स्वत:ला झोकून दिले, व तो साखर कारखाना अल्पावधीतच कर्जमुक्त करून तो शेतक-याच्या मालकीचा केला, कोयना शिक्षण संस्थेची स्थापना लोकनेते साहेबांनी केली पण यामध्ये राजकारण केले व त्यातून देसाई कुटूंबियांना वेगळे केले,त्या जिद्दीवर आबासाहेबांनी 1983 साली मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना करून सोनवडे या गावामध्ये पहिले म सुरू केले,आज हजारो विदयार्थी या शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेत आहेत.
आबासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे,आज या संस्थेची तीन माध्यमिक विदयालये,एक ज्युनिअर कॉलेज,व एक माध्यमाची शाळा असा शाखा विस्तार झालेला आहे,
या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा, बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव नथुराम कुंभार सर,सोनवडे यांची गावचे ग्रामस्थ महादेव पाटील,दिनकर शेजवळ,सुरेश महाडिक,सुनिल पानस्कर सर,विष्णू खांडेकर,विठ्ठल पाटील,तसेच न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने,न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.ए.के.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमावेळी स्व.शिवाजीराव देसाई यांच्या अर्धाकृती पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर यांनी केले,उपस्थितांचे स्वागत व आभार संतोष कदम यांनी केले,या कार्यक्रमासाठी सोनवडे, सुळेवाडी,हुंबरवाडी,खांडेकरवाडी,शिंदेवाडी गावातील ग्रामस्थ,पालकवर्ग तसेच मोरणा शिक्षण संस्था परिवारातील सर्व सेवक ,आजी-माजी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

