
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता खरात ,तसेच डॉ.प्राजक्ता महाडीक,डॉ.प्रज्ञा तासगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी डॉ. सुनिता खरात म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठी सकस आहार, पदार्थ, तसेच पालेभाज्या ,कडधान्य,यांचा आहारात वापर केला पाहिजे, तसेच नियमितपणे व्यायाम करणे व पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे,शरीरातील हीमोग्लोबीन चे प्रमाण, कमी होण्याची कारणे याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती सांगितली, यावेळी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले,तर .श्री.संजय डोंगरे सर यांनी मानले, यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.