शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे- मा.श्री. डी.एम शेजवळ 

सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे- मा.श्री. डी.एम शेजवळ 

 *पाटण –  मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी ते म्हणाले की,फुले कुटुबाचे कार्य महान असून मुलीच्या शिक्षणाची कवाडे खुली करून  दिली,त्यामुळे खरोखरच त्याचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,असे ते यावेळी म्हणाले,या कार्यक्रमादरम्यान  इ.9 वी च्या वर्गाने तयार केलेल्या ज्ञानाई या हस्तलिखिताचे प्रकाशन केले,तसेच भित्तीपत्रकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले, या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याद्यापक मा.श्री.पी.एल केंडे सर अध्यक्षस्थानी होते, यावेळी त्यांनी सावित्रीबांई फुले यांचे  शिक्षण विषयक विचार आपल्या भाषणातून सांगितले,तसेच इ.9 वी च्या वर्गाने तयार केलेल्या हस्तलिखित व भित्तीपत्रक यांचे तोंड भरून कौतुक केले,या कार्यक्रमावेळी कू. वैष्णवी शेजवळ, कू.एस.एस.मणेर,श्री.प्रवीण उदुगडे यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम  यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*