शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदने

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदने

पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज ‌विदयार्थ्यांनी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यांचा सण साजरा करण्यात आला, यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने सर हे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की,भारतातील अनेक भागात श्रावणात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो,रक्षाबंधन, हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे. जगभरात जिथे जिथे हिंदू धर्माचे लोक राहतात तिथे हा सण बंधू-भगिनींमध्ये साजरा केला जातो. या सणाला अध्यात्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे.थोडक्यात रक्षाबंधन म्हणजे बहीण- भावाच्या नात्यांचे ख-या अर्थाने प्रतिक आहे असे यावेळी ते म्हणाले,

विशेष म्हणजे विदयालयांतील विदयार्थ्यांनी स्वनिर्मित तसेच पर्यावरणपूर्वक राख्या तयार केल्या होत्या, हेच या रक्षाबंधन कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण ठरले होते, यावेळी विदयालयातील सर्व विदयार्थ्यांना एकत्रितरित्या राख्या बांधण्यात आल्या,यावेळी इ.9‌‌वी च्या मुलींनी रक्षाबंधन गीतांतून बहीण-भावाच्या नात्यांतील जिव्हाळा यांचे सादरीकरण केले,

या कार्यक्रमांचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ‌व विदयार्थी उपस्थित होते.