शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.

शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.

*राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते – श्री एस.डी. शेजवळ* पाटण– “राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते एक लोककल्याणकारी, दूरदृष्टी असलेले आणि सामाजिक समता प्रस्थापित करणारे युगपुरुष होते,” असे गौरवोद्गार शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री.एस.डी. शेजवळ यांनी व्यक्त केले.यावेळी ते म्हणाले, “शिक्षण, सामाजिक सुधारणा, शेतकरी कल्याण, महिलांचा सन्मान आणि मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी शाहू महाराजांनी घेतलेली ठोस पावले आजही मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचा पाया घातला.”कार्यक्रमात शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारे माहितीपट विद्यालयाचे उप शिक्षक श्री. संतोष कदम यांनी सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ए.के.जाधव यांनी केले तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते