
पाटण-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये मोरणा शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रविराज देसाई दादा व सचिव मा.श्री. डि.एम. शेजवळ (दादा) यांचे सुचनेनुसार गुणवत्ता वाढ विकास अंतर्गत शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन केले होते,या सहविचार सभेचे अध्यक्ष विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर होते,यावेळी ते म्हणाले की,विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे आहे, यासाठी प्रत्येक पालकांनी गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य केले पाहिजे,असे मत यावेळी व्यक्त केले,या सहविचार सभेसाठी उपशिक्षक श्री.कुंभार एस.डी. ,सौ.पटवेगार एस.सी. व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,या सहविचार सभेचे प्रास्ताविक श्री.उदुगडे पी.एस. यांनी केले तर आभार श्री.संजय डोंगरे सर यांनी मानले,