
पाटण -मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन कार्यशाळा मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचीव मा.श्री.डी. एम.शेजवळ दादा,यांची प्रमुख उपस्थिती होती,
यावेळी पाटण पोलीस ठाणे पाटण च्या निर्भया पथक प्रमुख मा.श्रीमती पी.ए.धोत्रे व मा.श्री.ए.बी.गुरव यांनी विद्यार्थ्याना बहुमोल असे मार्गदर्शन केले,या कार्यशाळेदरम्यान मा.श्रीमती .पी.एस.धोत्रे यांनी मुलीनो भयमुक्त जीवन जगायला शिका, कायदा,शासन प्रणाली, पोलीस मित्राची कार्य याविषयी खूप माहिती सांगीतली,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले तर आभार श्री.संजय डोंगरे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.