शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events पोलाद स्टील कंपनीचा  स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादा

पोलाद स्टील कंपनीचा  स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादा

पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात  पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने  तारागंण -आपली ओळख सूर्यमालेशी  कार्यशाळा मोरणा शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचीव मा.श्री.डी. एम.शेजवळ दादा, हे या कार्यक्रमाच्या उदघाट्न प्रसगी उपस्थीत होते,यावेळी ते म्हणाले की,

 थ्री डी च्या माध्यमातून  पोलाद  कंपनीने ओळख  आपली सूर्यमालेशी  एक चांगला उपक्रम हाती  घेतला आहे,ही बाब खूप कौतुकास्पद आहे,असे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमावेळी कंपनीचे प्रकल्प अधीकारी श्री. कीशोर  गोते ,व श्री.तानाजी चौगुले यांचा शाल्,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, 

तसेंच या कार्यशाळेसाठी न्यू इंग्लिश स्कुल नाटोशी या विदयालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थीत होते,

यावेळी सर्व उपस्थीताचे स्वागत  विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर यांनी केले,

,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले तर आभार  श्री.संजय डोंगरे   सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.