शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events संगणक साक्षरता  असणे आजच्या  काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवार

संगणक साक्षरता  असणे आजच्या  काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवार

 

पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये पाटण तालुका संगणक असोशिएशन यांच्या वतीने संगणकाचे विविध प्रकारचे कोर्सेस तसेच रोजगाराच्या अनेक संधी याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली होती, यावेळी तालुका समन्वयक तथा श्री. कंप्युटर प्रशिक्षण संस्था नाडे – नवारस्ता  या प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री.प्रकाश पवार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते,

त्यावेळी ते म्हणाले की,आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक युवक- युवती ला संगणक चालवता येणे खूप आवश्यक आहे, ज्या व्यक्तीला संगणक चालविता येत नाही तो निरक्षर म्हणून गणला जावू लागला आहे, यासाठी अनेक शासनमान्य विविध कोर्सेस अल्प फी मध्ये उपलब्ध असून त्याचा फायदा आजच्या तरुण पिढी ने घेतला पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले, या कार्यशाळेसाठी  श्री.नवनाथ पवार, श्री.साठे सर, तसेच पाटण तालुक्यातील नवारस्ता ,पाटण, मोरगिरी, ढेबेवाडी, मारुल हवेली या भागातील संगणक प्रशिक्षण संस्था केंद्र संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती,  या कार्यक्रमावेळी  सर्व उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे उप शिक्षक श्री.पी.एस. उदुगडे यांनी केले तर आभार वरीष्ठ शिक्षक श्री.संजय डोंगरे यांनी मानले 

या कार्यशाळेसाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते