शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events मोरणा  शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट 

मोरणा  शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट 

पाटण रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने व सोनवडे गावचे सुपुत्र माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर सर यांच्या सहकार्याने  मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी , या माध्यमिक विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट वितरण करण्यात आले, यावेळी रोटरी क्लब मुंबई साऊथ चे चेअरमन  मा. श्री.शिवप्रसाद कठोड,सचिव श्रीमती नर्गिस गौर,जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.विजय पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.जे.ए.पाटील, पंचायत समिती सदस्य श्री.संतोष गिरी , माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, मोरणा  शिक्षण संस्थेचे सचिव डी.एम.शेजवळ, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एस.मदने ,न्यू इंग्लिश स्कूल येराड या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.विजय शिर्के, वाल्मीकी विद्यामंदिर भालेकरवाडी या विद्यालयाचे उप शिक्षक श्री. रामचंद्र मोहिते, श्री.गणेश चव्हाण, श्री, विजय सकपाळ, सोनवडे ,हुंबरवाडी , शिदेवाडी, सुळेवाडी गावचे सरपंच,उपसरपच,व सर्व सदस्य,आजी माजी  विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, यांच्या उपस्थितीत श्री नवलाई मंदीर पटागंणात घेण्यात आला, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यालयास  एक लॅपटॉप, व स्पोर्ट्स कीट चे वितरण करण्यात आले.तत्पूर्वी रोटरी क्लब मुंबई साऊथचे पदाधिकारी यांनी शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात सदीच्छा भेट दिली यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या पुतळ्यास पुषपहार घालण्यात आला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी. एल. केंडे सर यांनी सर्व उपस्थितांचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून स्वागत केले,  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते,