शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…

विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…

मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे  प्राथमिक शिक्षक व त्याचे बंधू श्री.शरद कचरे  राज्य विक्रीकर अधिकारी यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर व सर्व शिक्षक यांच्या वतीने श्री.प्रदीप कचरे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच त्यांचे बंधू श्री.शरद कचरे यांची राज्य विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री संजय डोंगरे यांनी मानले, यावेळी विद्यालयातील  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,व सर्व  विद्यार्थी उपस्थित होते.या कचरे कुटूबातील  मुलांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब , मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई ,सचिव श्री डी एम शेजवळ , बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री एन.एस.कुंभार, तसेच आटोली  पाचगणी गावचे सरपंच उपसरपंच व मोरणा विभागातील  ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिंनंदन केले.