शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे*  इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे*  इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री.व्ही.डी. कुऱ्हाडे हे होते, तर कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा हे होते.यावेळी  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.व्ही.डी.कुऱ्हाडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती अजिबात  बाळगू नये, अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे, कोणतीही गोष्ट अवघड नाही, नकारात्मक विचार पूर्णपणे मनातून काढून टाका, यशाचा मार्ग जरी खडतर असला तरी यासाठी योग्य तो निवडा, आपल्या आई – वडील  यांचे स्वप्न पूर्ण करा, उच्च ध्येय ठेवा, तसेच शिक्षकांविषयी, वडीलधाऱ्या मंडळीविषयी आदर बाळगा, चांगली मित्र – परीवार निवडा व आयुष्याची उच्च  स्वप्ने मिळविण्यासाठी प्रयत्न करा, यश मिळाल्यावाचून  राहणार नाही, असे ते त्यावेळी म्हणाले, तत्पूर्वी एन.एम.एम.एस.परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्याच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला,यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम, श्री संजय डोंगरे, व कु.शबाना मणेर यांचा शाल श्रीफळ, पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.पी.एल. केंडे सर यांनी विद्यालयाचा वार्षिक गुणवत्ता अहवालाचे , उपक्रमाचे आपल्या मनोगतातून  व्यक्त केले, या कार्यक्रमासाठी बाळासाहेब देसाई फौंडेशन सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाश शेजवळ, श्री.डी

आर.शेजवळ, श्री.संजय घाडगे, श्री.विष्णू खांडेकर,श्री.विष्णू पाटील, श्री. विठ्ठल सुर्वे,  श्री.अजय शेजवळ, श्री.राजाराम शेजवळ, यांची प्रमुख उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले, तर आभार श्री संजय डोंगरे सर यांनी मानले, यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.