शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events शिवाजीराव देसाई विद्यालय  सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन  साजरा 2023

शिवाजीराव देसाई विद्यालय  सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन  साजरा 2023

पाटण:-   मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात भारतीय संविधान दिन  साजरा विविध उपक्रमांनी साजरा करन्यात आला, या  वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई यांचे पुतळ्यास पुष्पहार विद्यालयातील विद्यार्थ्यांचे हस्ते घालण्यात आले. तसेच मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे शहिदांना मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविराज देसाई दादा, सचिव डी एम शेजवळ दादा विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  यांचे वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी   विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,  त्यावेळी ते म्हणाले की, भारताचे संविधान राज्यघटना, हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये , नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे आहेत,असे ते म्हणाले, यावेळी संविधान संहितेचे सामूहिक प्रकट वाचन करण्यात आले. विदयालयातील उपशिक्षक,श्री संजय डोंगरे, संभाजी कुंभार, भिसे सर, मनेर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम सर यांनी केले तर आभार प्रवीण उदुगडे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.