शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)

पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर हे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की,डॉ.कलामसाहेब यांनी आपले शिक्षण खडतर प्रवासातून पूर्ण केले, तसेच आजच्या पिढीला त्यांनी केलेले कार्य खूप प्रेरणादायी आहे, त्यांचे विचार नव्या पिढीने खूप आवश्यक आहे,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले,

या कार्यक्रमांवेळी विदयार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉ.कलाम साहेबांचा जीवनपट सांगितला,तसेच वाचनगीत ही सादर केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले.यावेळी विदयालयातील सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.