
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली, यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.पी.एल.केंडे सर हे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की, म.गांधीजीनी सत्याचा मार्ग स्वीकारला, अहिंसेचे तत्व स्वीकारले,आजच्या काळात विदयार्थ्यांनी महात्मा गांधीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे आहे,असे मत यावेळी व्यक्त केले, या कार्यक्रमावेळी विदयालयातील विदयार्थ्यांनी तसेच विदयालयातील उपशिक्षक श्री.पी.एस.उदुगडे, श्री.एस.व्ही.भिसे, कु.एस.एस.मणेर यांनी मनोगत व्यक्त केली,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले, तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले, या जयंती कार्यक्रमांवेळी विदयालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.