शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर

बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर

पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते,तसेच कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ हे होते, यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर म्हणाले की, बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्या बालकांचा शारिरिक विकास होणे अत्यंत महत्वांचा आहे, यासाठी शालेय स्तरांवर विविध क्रिडा प्रकार घेणे आवश्यक आहे,यामुळे त्या बालकांचा ख-या अर्थाने सर्वांगीण विकास होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले,यावेळी बेलवडे केंद्राच्या केंद्रसंचालिका श्रीमती सुनिता नांगरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमांदरम्यान बेलवडे केंद्रांतील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प ,पेन देवून सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमांचे प्रास्ताविक शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे विदयालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,या कार्यक्रमांसाठी बेलवडे केंद्रांतील शिक्षक,खेळाडू तसेच विदयालयातील सर्व शिक्षक,विदयार्थी उपस्थित होते.