शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम

मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम

पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत वृक्षारोपन करण्यात आले,यावेळी शालेय विदयार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले,तसेच खाऊ वाटपही करण्यात आले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने सर याानी विदयालयाच्या वतीने मा.श्री.रविराज देसाई दादा यांना शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमांचे प्रास्ताविक व स्वागत विदयालयातील उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले तर आभार श्री.संजय डोेंगरे यांनी मानले, या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ‌विदयार्थी उपस्थित होते.