मोरणा शिक्षण संस्था संचलित, शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे ता.पाटण जि.सातारा या विद्यालयाच्या प्रांगणातील लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवार दि .१२-०७-२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेबांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी मोरणा शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रविराज देसाई (दादा), लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा),मा.श्री.रमेश देसाई(साहेब), मा.जयराज देसाई (दादा), मा.आदित्यराज देसाई (दादा), संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ, उपाध्यक्ष मा.श्री.भरत साळुंखे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री. नथुराम कुंभार,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. जयवंतराव शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री.बाळासाहेब पाटील व सर्व संचालक, शिवदौलत बँकेचे चेअरमन मा.श्री. संजय देशमुख व सर्व संचालक, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समितीचे सदस्य यांचेसह विद्यार्थी, शिक्षक,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.ना.शंभूराज देसाई साहेब म्हणाले, स्व. आबासाहेबांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून पाटण तालुक्याच्या सहकार व शिक्षण क्षेत्रात उभे केलेले कार्य आदर्शवत आहे. शाळेच्या परिसरात उभारलेला त्यांचा अर्धाकृती पुतळा सर्व विद्यार्थी व नागरिकांना सदैव प्रेरणा देत राहील. संस्थेचे अध्यक्ष श्री. रविराज देसाई चांगल्या प्रकारे शिक्षणसंस्था चालवून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आबासाहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मा.नामदार शंभूराज देसाई साहेबांनी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई दादा म्हणाले, पाटण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी ९ जुलै १९८२ रोजी स्व.आबासाहेबांनी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी या संस्थेची स्थापना केली. १९८६ साली आबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेली संस्था नावारूपाला आणण्यासाठी मा.नामदार शंभूराज देसाई साहेबांनी नेहमीच सहकार्य केले. सर्वच शाखांच्या सुसज्ज इमारती, भौतिक सुविधांसाठी मदत केली असून आबासाहेबांच्या आदर्शानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संस्थेचे सचिव मा.श्री. डी.एम.शेजवळ यांनी प्रास्ताविक केले व मुख्याध्यापक श्री. काशिनाथ चव्हाण यांनी आभार मानले.
























