शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी

मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी

गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाण
पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांचा या ठिकाणी गुलाबपुष्प व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे  मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की,प्राचीन काळापासून आपल्याला गुरू परंपरा लाभलेली आहे, आजच्या काळातही गुरूला अनन्य साधारण महत्व आहे, मानवी जीवनात गुरूचे स्थान अविभाज्य आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने श्री.मदने जे.एस.,श्री.भिसे एस.व्ही,श्री.डोंगरे एस.एल.श्री.कदम एस.बी तसेच वैष्णवी कुंभार, ओंकार शेजवळ,प्रज्ञा शेजवळ,वैष्णवी शेजवळ यांनी मनोगते व्यक्त केली ,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक व आभार विदयार्थिनी सानिका शेजवळ हिने मानले.