*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री के.जे.चव्हाण हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते,त्यावेळी ते म्हणाले की,राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी,समाजप्रिय राजे होते,त्यांनी कोल्हापूर संस्थानाचे कुटूंबप्रमुख होते,त्यांनी बहूजन समाजाच्या हितांचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले,या त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली असे ते यावेळी म्हणाले
या कार्यक्रमांवेळी एस.एल.डोंगरे,एस.व्ही.भिसे,पी.एस.उदुगडे,एस.एस.मणेर,यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले तर आभार एस.डी.कुंभार यांनी केले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.
