पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिसूर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण हे या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते,त्यावेळी ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासूनच संघर्ष करावा लागला, परंतू ते खचून न जाता आलेल्या परिस्थितीला मूकपणे तोंड दिले,व त्यांनी जगाला एक भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आदर्श घालून दिलेला आहे,त्यांचा विचार आजच्या तरूणांनी तळा-गाळापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे,असे ते यावेळी म्हणाले* *यावेळी एस.एल.डोंगरे,एस.व्ही.भिसे,एस.डी.कुंभार,जे.एस.मदने,एस.एस.मणेर ,पी.एस.उदुगडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपट मनोगतातून व्यक्त केला.यावेळी सामूहीक भारतीय संविधानाचे प्रकटवाचन करण्यात आले,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले तर आभार ए.के.जाधव यांनी मानले,या कार्यक्रमांसाठी विदयालयांतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,विदयार्थी उपस्थित होते.*
